Type Here to Get Search Results !

चिंतामणी भारती व बाळू महाराज काकानी यांना श्री दत्तशिखर संस्थानवर पाऊल ठेवण्यास प्रतिबंध अन्नत्याग आंदोलन स्थगित

 चिंतामणी भारती व बाळू महाराज काकानी यांना श्री दत्तशिखर संस्थानवर पाऊल ठेवण्यास प्रतिबंध

 अन्नत्याग आंदोलन स्थगित. 




श्रीक्षेत्र माहूर ता. प्र. संजय वडस्कर 


 प. पू.चिंतामणी भारती महाराज यांनी आपल्या काही मागण्यासंदर्भात श्री दत्तशिखर संस्थानवर अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते.त्यानुषंगाने पंचदशनाम जुना आखाड्याचे राष्ट्रीय अध्यक्ष प.पू.प. म. मोहन भारती महाराज यांनी दि.19 सप्टें. रोजी श्रीदत्त शिखर संस्थानला भेट देऊन दोन्हीकडील बाजू ऐकून घेतली,


 आणि चिंतामणी भारती महाराज व बाळू महाराज यांना दि.5 ऑक्टों.पर्यंत  शिखर संस्थान व अनुसयामाता मंदिरावर पाऊल ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले.त्या निर्णयामुळे चिंतामणी भारती महाराज यांनी आपले अन्नत्याग आंदोलन सातव्या दिवशी मागे घेतले.


        चिंतामणी भारती यांनी श्रीदत्त शिखर संस्थानच्या व्यवस्थापना बाबत धर्मादाय आयुक्त कार्यालयात लेखी स्वरूपात काही बाबीवर आक्षेप नोंदविला होता.तसेच त्यांचे बाबतही संस्थानच्या व्यवस्थापन समितीच्या काही तक्रारी होत्या.त्या पार्श्वभूमीवर संस्थानच्या वतीने ते राहत असलेल्या खोलीला कुलूप लावण्यात आले होते


.त्या निषेधार्थ चिंतामणी भारती यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते.दशनाम जुना आखाड्याचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा प.पू.प.म.मोहन भारती महाराज यांनी संस्थानचे व्यवस्थापन व चिंतामणी भारती महाराज या दोघांनी एकमेकांविरुद्ध  परस्पर केलेल्या आरोपा संदर्भात महापुरुषांची एक समिती गठीत केली जाईल, 


आणि ती समिती दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून व पुरावे तपासून 3 ऑक्टोंबर रोजी आपला अहवाल देईल,त्यानुसार 5 ऑक्टोंबर रोजी अंतिम निर्णय घेतला जाईल असे सांगून तो पर्यंत दोघांनाही श्रीदत्त शिखर संस्थान व अनुसया माता मंदिरावर पाऊल ठेवण्यास मज्जाव करण्यात आला असल्याचे प.पू.प.म.मोहन भारती यांनी पत्रकारांना सांगितले. सदरचा निर्णय आपल्यास मान्य असल्याची कबुली यावेळी चिंतामणी भारती महाराज यांनी दिली.

Post a Comment

0 Comments