Type Here to Get Search Results !

तांडा विकासाच्या चळवळीला नवे बळ; अखिल भारतीय तांडा सुधार समितीची नांदेड जिल्हा व माहूर तालुका कार्यकारिणी जाहीर

 तांडा विकासाच्या चळवळीला नवे बळ; अखिल भारतीय तांडा सुधार समितीची नांदेड जिल्हा व माहूर तालुका कार्यकारिणी जाहीर





लखमापूर : अखिल भारतीय तांडा सुधार समितीच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी अनिल राठोड यांची निवड करण्यात आली असून जिल्हा उपाध्यक्षपदी संतोष गणपत पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील तांड्यांच्या विविध प्रश्नांना संघटित आवाज देण्यासाठी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवर महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

तसेच माहूर तालुका कार्यकारिणीत तालुकाध्यक्षपदी कैलास नामदेव जाधव, उपाध्यक्षपदी अरविंद पवार, सचिवपदी प्रकाश फुलसिंग जाधव, कोषाध्यक्षपदी सूरज फुलसिंग राठोड, सहकोषाध्यक्षपदी जीवन लालसिंग राठोड यांची नियुक्ती करण्यात आली असून अर्जुन जाधव, इवळेश्वर यांचाही कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे.

तांड्यांतील शिक्षण, आरोग्य, रोजगार, रस्ते, पिण्याचे पाणी तसेच इतर मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्न शासन व प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यांच्या सोडवणुकीसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यावर संघटनेचा भर राहणार आहे. तळागाळातील नागरिकांना विकासाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी सक्रियपणे काम करण्याचा निर्धार नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

नवीन जिल्हा व तालुका कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या पुढील सामाजिक व संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत. ग्रा, (प्रतिनिधि)

सक्षम महाराष्ट्र न्यूज़ लखमापुर, वाई, सर्कल दता जाधव

Post a Comment

0 Comments