आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण चर्चा
माहूर ग्रा. प्र. शरीफ शेख
श्रीक्षेत्र माहूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माहूर तालुका एआयएमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी नांदेड येथे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन संघटनात्मक बांधणीसह विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. पक्षाच्या आगामी वाटचालीच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
माहूर तालुका एआयएमआयएमचे अध्यक्ष सज्जाद भाई आणि युवा नेते इरशाद भाई मकरानी यांनी महाराष्ट्राचे माजी प्रदेशाध्यक्ष सैयद मोईन, मराठवाडा अध्यक्ष फिरोज लाला तसेच शमीम अब्दुल्ला यांची भेट घेतली.
या भेटीदरम्यान आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायत निवडणुका, पक्षाची संघटनात्मक बांधणी तसेच सामाजिक उपक्रमांबाबत चर्चा करण्यात आली. यासोबतच गोरगरीब नागरिक, एकल महिला आणि दिव्यांग बांधवांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून प्रयत्न करण्याबाबतही चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.
माहूर तालुक्यात पक्षाची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी गावपातळीवर पक्षाची उपस्थिती वाढविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. “गाव तिथे शाखा, घराघरात एमआयएम” असा नारा देत संघटनात्मक विस्तारावर भर देण्याचे यावेळी सांगण्यात आले.
माहूरच्या विकासाच्या विविध प्रश्नांवर नागरिकांच्या संपर्कात राहून सामाजिक उपक्रम राबविण्याबाबतही पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली.
या बैठकीस तालुका अध्यक्ष सज्जाद भाई, युवा नेते इरशाद मकरानी, फैजुल्ला खान, इरफान बागवान, समीर शहेजाद, नवाब आयुब बाबा, अरशद खान, शाहीद लाला, बबलू टेलर, आजीस भाई यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आगामी निवडणुकांसाठी संघटन मजबूत करण्यावर भर
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माहूर तालुक्यात पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासोबतच सामाजिक उपक्रमांना चालना देण्यावर बैठकीत भर देण्यात आला.
गावागावात कार्यकर्त्यांचे जाळे मजबूत करून नागरिकांच्या प्रश्नांसाठी काम करण्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली.

Post a Comment
0 Comments