मराठवाड्यासह नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यात भीषण टंचाई निर्माण झाली असून, हा संपूर्ण भाग तातडीने 'कोरडा दुष्काळ' म्हणून जाहीर करण्यात यावा,
माहूर : ग्रा.प्र.शरीफ शेख
अशी आक्रमक मागणी माहूर तालुका व शहर काँग्रेस पक्षाने माहूर तहसीलदार मार्फत राज्य सरकारकडे केली आहे.
मराठवाड्यात आणि विशेषतः माहूर परिसरात पावसाने प्रदीर्घ खंड दिल्याने सोयाबीन, कापूस, ज्वारी यांसारखी खरिपाची पिके पूर्णपणे करपून गेली आहेत.
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना प्रति एकरी 1 लाख रुपयांची आर्थिक मदत तात्काळ मिळावी आणि संपूर्ण कर्जमाफी व्हावी, यासाठी माहूर तालुका काँग्रेस पक्षाकडून निवेदने व आंदोलने करण्यात आले आहे.
माहूर काँग्रेस पक्षाच्या मुख्य मागण्या:
• तातडीने दुष्काळ जाहीर करा: संपूर्ण मराठवाडा आणि विशेषतः माहूर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा.
• एकरी ₹1 लाख आर्थिक मदत: पिकांच्या झालेल्या १००% नुकसानीची भरपाई म्हणून शेतकऱ्यांना तातडीने भरीव एकरी मदत द्यावी.
• सरसकट पंचनामे व पीक विमा: महसूल आणि कृषी विभागाने तातडीने नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळवून द्यावी.
• कर्जमाफी आणि इतर सवलती: शेतकऱ्यांचे संपूर्ण वीज बिल व कृषी कर्ज माफ करण्यात यावे यासाठी आज रोजी तहसीलदार मार्फत राज्य शासनाकडे मागणी करण्यात आली.
यावेळी काँग्रेस पक्षाचे माहूर तालुका अध्यक्ष आनंद पाटील तुपदाळे, जेस्ट काँग्रेस नेते मोहन राठोड, काँग्रेस तालुका सरचिटणीस सैय्यद अली सैय्यद अब्दुल, मा.उपनगराध्यक्षा सौ.अश्विनी आनंद पाटील तुपदाळे, नगरसेविका लतीफा बी शेख मस्तान,नगरसेविका सौ.कविताताई राजू सौंदलकर, नगरसेवक प्रतिनिधी तथा काँग्रेस नेते निसार कुरेशी, नगरसेवक प्रतिनिधी तथा काँग्रेस पक्षाचे ता. समन्वयक राजु एकनाथ सौंदलक,
काँग्रेस नेते सय्यद ईसा सय्यद खाजा, शहर अध्यक्ष शेख सादिक शेख मुस्सा, युवक काँग्रेसचे ता.अध्यक्ष सचिन बेहेरे, काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष माधवराव मुंडे, तालुका महासचिव अहेमद कुरेशी, संदीप दादाराव सुकळकर, जगदीश पाटील तुपदाळे, शेख रफिक शेख महेबूब, गंगाधर शंकर फड, सुशीलकुमार ताक, गुरुदास राजू चव्हाण,
सौ.सरस्वती विशाल पाटील तुपदाळे, इंदिरा सुभाष पांडे,शहर कार्याध्यक्ष शरीफ शेख महेबूब यांच्यासह माहूर तालुका व शहर काँग्रेस पक्षातील नेते,पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments