Type Here to Get Search Results !

सिव्हिल खराब’ म्हणत शेतकऱ्यांना गेट आउट! बँकांच्या भूमिकेवर संताप; थेट नांदेडमध्ये धडक



“‘सिव्हिल खराब’ म्हणत शेतकऱ्यांना गेट आउट! बँकांच्या भूमिकेवर संताप; थेट नांदेडमध्ये धडक”




सिव्हिल खराब आहे… गेट आउट!”






माहूर ता. प्र. संजय वडस्कर

शेतकऱ्यांना कर्ज देताना बँकांकडून अशीच वागणूक मिळत असल्याचा आरोप करत माहूर आणि किनवट तालुक्यातील शेतकरी आता आक्रमक झाले आहेत.


माहूर आणि किनवट हे कोरडवाहू तालुके म्हणून ओळखले जातात. यंदा पावसाचे प्रमाण
कमी असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.


दरम्यान, शासनाकडून कर्जमाफी जाहीर झाल्यानंतर पुन्हा कर्ज मिळेल, या आशेने शेतकरी बँकांकडे गेले. मात्र, सिबिल खराब असल्याचे कारण देत तसेच सामाईक गटातील शेतकऱ्यांना कर्ज देताना टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.


माहूर तालुक्यातील वाई बाजार आणि किनवट तालुक्यातील उमरी बाजार येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखांमध्ये हा प्रकार सुरू असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला.


या प्रकारामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आमदार हेमंत पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांच्या पत्रासह दि. २१ सप्टेंबर रोजी नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालय तसेच महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या क्षेत्रीय अधिकारी कार्यालयात धडक देत आपल्या समस्या मांडल्या.


यावेळी शिवसेना जिल्हा सहसंपर्कप्रमुख रवि राठोड यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांनी बँकांच्या कर्जप्रक्रियेबाबत आपली व्यथा अधिकाऱ्यांसमोर मांडली.


सिबिलच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांना कर्ज नाकारले जात आहे का?

सामाईक गटातील शेतकऱ्यांच्या कर्जप्रकरणात नेमकी अडचण काय आहे?

आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांवर प्रशासन काय निर्णय घेणार?


याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.



यावेळी रवि राठोड, जीवला नाईके, साहेबराव जाधव, दिनेश राठोड, रमेश राठोड, वसंत जाधव, सागर राठोड, कुवरसिंग राठोड यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.


शेतकऱ्यांना कर्जासाठी बँकेच्या दारात हेलपाटे मारावे लागू नयेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.


सक्षम महाराष्ट्र न्यूज — शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे व्यासपीठ.


🚨 “सिव्हिल खराब… गेट आउट!”


शेतकऱ्यांना बँकेतून हाकलले?


कर्जासाठी शेतकऱ्यांचा एल्गार!


थेट नांदेडमध्ये धडक!

Post a Comment

0 Comments